Meaning & Translation
✨Spiritual Benefits
📜About this Mantra
Frequently Asked Questions
एकादशीचे महत्त्व काय आहे?
हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशीला पापांचा नाश करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी तिथी असं वर्णन केलय. या दिवशी उपवास, जप, नामस्मरण, विष्णु पूजन, गीता पठन आणि जागरण यांना विशेष महत्त्व आहे. एकादशीच व्रत केल्याने अनेक जन्मांची पाप नष्ट होतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होत असते.
एकादशीची पौराणिक कथा काय आहे?
एकदा मूर् नावाचा अत्यंत बलवान राक्षस देवतांना त्रास देत होता. देवांनी भगवान श्रीहरी विष्णूंकडे धाव घेतली. भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या राक्षसाशी हजारो वर्ष युद्ध केलं. युद्धा दरम्यान भगवान एका गुहेत विश्रांती घेत होते, तेव्हा मूर राक्षस भगवानांवर आक्रमण करण्यासाठी पुढे आला. त्याच क्षणी भगवानांच्या दिव्य तेजातून एक अद्भुत देवी प्रकट झाली. क्षणातच भगवान जागे झाल्यावर त्यांनी त्या देवीला वरदान मागण्यास सांगितलं. आणि देवी म्हणाली की आज ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी जो उपवास करेल, जप करेल आणि तुमची भक्ती करेल त्याला सर्व पापांतून मुक्ती मिळेल. भगवान श्रीहरी विष्णूंनी क्षणाचाही विलंब न करता तिला एकादशी हे नाव दिलं.
एकादशीच्या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत?
एकादशीच्या दिवशी 'ओम नमो भगवते वासुदेवाय', 'विष्णू गायत्री मंत्र (ओम नारायणाय विध्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात)', 'ओम नमो नारायणाय', 'शांताकारम भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम', 'ओम विष्णवे नमः', 'हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे' आणि 'विष्णू सहस्त्रनाम' या मंत्रांचा जप करावा.
एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे?
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ पिवळी किंवा पांढरी वस्त्रे परिधान करावीत, तुळशी मातेला नमस्कार करावा, भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले, तुळशी पत्र आणि गोड नैवेद्य अर्पण करावा. ब्रह्म मुहूर्तावर नामस्मरण करावे, दुपारी भगवद्गीतेचे वाचन करावे आणि संध्याकाळी विष्णू आरती करावी. जप करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे, कुषासन किंवा स्वच्छ आसन वापरावे आणि तुळशीची किंवा स्फटिकाची माळ वापरावी. तामसिक अन्न, कांदा, लसूण, तांदूळ (भात) खाणे पूर्णपणे टाळावे. राग, खोटे बोलणे, निंदा करणे, हिंसा करणे किंवा कोणतेही व्यसन करणे हे सुद्धा टाळावे.